मराठी प्रेक्षक सोशल मीडियावर काही मराठी अभिनेत्यांना सतत ट्रोल का करतात

सोशल मीडियावर नेहमी सचिन पिळगावकर किंवा स्वप्नील जोशी आणि अशा अनेक मराठी अभिनेत्यांना लोक ट्रोल करताना आपण पाहत असतो,आणि हल्लीच संतोष जुवेकर यांना लोकांनी इतकं ट्रोल केलं की सोशल मीडियाच्या इतिहासात कधीच असे घडले नसेल नेहमी हे पहायला मिळते की जे कलाकार हिंदीत काम केल्यावर त्यावर जे वक्तव्य करतात त्यावरून ट्रोल होतात, मुळात आपण हे समजून घेतले पाहिजे की मरठी प्रेक्षक आपल्याच मराठी अभिनेत्यांना ट्रोल का करतात? मराठी प्रेक्षकांना हिंदीत काम केलेलं आवडत नाही का? असा प्रश्न चिन्ह निर्माण होतो किंवा हे अभिनेते मराठीत मुख्य भूमिका आणि हिंदीत दुय्यम भूमिका करतात याचा मराठी प्रेक्षकांना राग येतो का? जे मराठी प्रेक्षक यांना ट्रोल करतात ते मराठी चित्रपट प्रेमी असतात का हे पण पाहण्याची गरज आहे, जर मराठी प्रेक्षकांनी मराठी चित्रपट आवर्जून पाहिले तर यांना हिंदीत काम करण्याची गरजच उरत नाही ज्या प्रमाणे साऊथमधील चित्रपट त्यांचे लोक आवडीने पाहतात यामुळेच ते मोठे सुपरस्टार होऊ शकले, पण मराठीत सुपरस्टार ही संकल्पनाच नाहीये आणि त्यामुळे मराठी अभिनेते हे केवळ नट असल्याने हिंदीत पण काम कर...